Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वॉटर ग्रेस कंपनी संदर्भात सुरू असलेली चौकशी पूर्ण ; अहवाल सादर होऊनही आयुक्तांकडून कारवाईस टाळाटाळ..?

दि . 03/02/2020

मालेगाव शहरातील कचरा उचलणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनी संदर्भात सुरू असलेली चौकशी पूर्ण झाली असून यासंदर्भातील सदर अहवाल आयुक्तांच्या टेबलावर येऊन पोहोचला असला तरी ठेकेदारावर  कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे.

तत्कालीन आयुक्त संगीता धायगुडे यांनी वॉटर ग्रेस कंपनी विरोधात वेळोवेळी दाखल होत असलेल्या तक्रारीनुसार समिती गठीत करत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार समितीने चौकशी अहवाल तयार करून मनापा आयुक्तांच्या समोर सादर केला असूनही अद्याप कारवाही होत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

या संदर्भात अहवालाची प्रत पाहिल्यावर असे दिसून येते कि,  वॉटर ग्रेस आपल्या कामात कामचुकारपणा करीत असून नियमांचे पालन करीत नाही. सदर चौकशी अहवालानुसार वॉटर ग्रेस चा ठेका त्वरित रद्द होऊ शकतो ?

मालेगाव मनपाच्या स्वच्छतेविषयी वेळोवेळी वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी वाभाडे काढले. त्यावर अनेक वेळा चौकशी देखील झाल्यात पण अद्यापही अस्वच्छतेचा अजगर हा मालेगावकच्या करदात्यांचा पैसा खातोच आहे. त्यामुळे मालेगाव शहर हे प्रदूषणाने बेजार होत चालले आहे. तरीदेखील वेळोवेळी या ठेकेदाराच्या विरोधात जाण्याची मुळातच येथील राजकीय मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे.

मनपा उपमहापौर यांनी देखील या कंपनीच्या विरोधात मोठे ऑपरेशन केले होते. त्यानंतर येणाऱ्या महासभेत तो विषय महासभेसमोर मांडणार असल्याचेही उपमहापौर यांनी माध्यमांना सांगितले होते. व त्यावर चौकशी करून कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनतर महासभा होऊन देखील कचऱ्याच्या विषयावर महासभेत कोणताही विषय ठेवण्यात आलाच नाही. त्यामुळे उपमहापौरांनी केलेलं ऑपरेशनच संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. असेच असेल तर मालेगावच्या स्वच्छतेचा विषयवार कुणी बोलेल का ? असा सवाल मालेगावकरांना पडला आहे. कसमादे अपडेट्स च्या हाती हा अहवाल लागला असून त्या अवहालानुसार प्रशासकीय पातळीवर या कंपनीवर जे आरोप ठेवण्यात आले आहेत त्यानुसार हा ठेका कधीच रद्द होऊ शकला असता पण राजकीय आर्थिक कारणांमुळे हा अहवाल अद्यापही समोर न आल्याचे दिसते.  


ताज्या बातम्या