Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
BUDGET2020 : अर्थसंकल्प २०२० सादर; कुणाला काय मिळालं?

दि . 01/02/2020

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडला. आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर कऱण्यास सुरुवात झाली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प होता. आर्थिक स्तरावर अनेक आव्हानांना सामोरं जाणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी, या अर्थसंकल्पातून अनेक तरतूदी करण्यात आल्या. अर्थसंकल्प २०२० मध्ये कृषी, ग्रामीण, शिक्षण, आरोग्य यांवर अधिक भर देण्यात आला आहे. 

 *अर्थसंकल्प २०२० मधील ठळक मुद्दे... -* 


- निफ्टी १८७ अंकांनी कोसळला.

- अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजार ५५० अंकांनी कोसळला.


- १५ लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के टॅक्स.

- १२.५० ते १५ लाखांपर्यंत २५ टक्के टॅक्स.

- १० ते १२.५० लाखांपर्यंत २० टक्के टॅक्स.


- ७.५ ते १० लाखांपर्यंत १५ टक्के टॅक्स.

- ५ ते ७.५ लाखांवर १० टक्के टॅक्स.

- ५ लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स नाही.

- १० टक्के आर्थिक विकासदर गाठण्याचं उद्दिष्ट.

- एलआयसीमधील मोठी भागीदारी विकणार.

- सरकारी बँकांसाठी ३ लाख ५० हजार कोटी रुपये.

- काश्मीर, लडाख योजनांसाठी विशेष योजना.

- जम्मू-काश्मीरसाठी ३२ हजार कोटी.

- लडाख विकासासाठी ५ हजार ९०० कोटी.

- कायद्यानुसार टॅक्स चार्टर लागू करणार.

- करदात्यांची सरकार काळजी घेणार.

- व्यापाऱ्यांच्या टॅक्सबाबत न्यायिक भूमिका.

- टॅक्स चोरी करणाऱ्यांसाठी कडक कायदा.

- कररचनेसंदर्भात क्लिष्ट कायदे सोपे करणार.

- बँकेतील ग्राहकांच्या ठेवींच्या नुकसानभरपाईसाठी विम्याची मर्यादा एक लाखावरून पाच लाखांपर्यंत वाढवणार. 

- महिलांच्या योजनेसाठी २८ हजार ६०० कोटी.

- झारखंडमध्ये आदिवासी संग्राहलय (ट्रायबर म्युझियम) उभारणार.

- ५ पुरातत्व केंद्रांचा विकास करणार.

- सांस्कृतिक मंत्रालयासाठी ३ हजार १०० कोटी.

- अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय जातींच्या विकासासाठी ८५ हजार कोटीच्या निधीची तरतूद.

- अनुसूचित जमातींच्या विकासासाठी ५३,७०० कोटीची तरतूद.

- ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी ९५०० कोटींची तरतूद. 

- बेटी बचाओ, बेटी पढाओचं राजकारण नको.

- शाळांमध्ये मुलींची संख्या वाढली.

- बेटी बचाओ, बेटी पढाओचा चांगला परिणाम.

- ५५० रेल्वे स्टेशन वाय-फायशी जोडणार.

- PPP मॉडेलवर नव्या १५० रेल्वेचा प्रस्ताव.

- नदी काठांवरील शहरांसाठी अर्थगंगा योजना.

- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने पूर्ण करणार.

किनारी शहरातील व्यापारांसाठी अर्थगंगा योजना.

- २७ हजार किलोमीटरवर गॅसग्रीडचा विस्तार.

- इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंग इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्र्यांची नव्या योजनेची घोषणा, ५ वर्षात १०० लाख कोटींच्या गुंतवणुकीचं लक्ष्य. 

- २००० किमीचा सागरी मार्ग तयार करणार.

- २०१३ पर्यंत दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे पूर्ण होणार.

- आरोग्य योजनांसाठी ७० हजार कोटींची मोठी घोषणा.

- लोकांचं उत्पन्न वाढवण्यावर भर देऊन क्रयशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणार.

 शिक्षण क्षेत्रासाठी ९९ हजार ३०० कोटी, कौशल्य विकासासाठी ३ हजार कोटी.

 - नॅशनल पोलीस युनिव्हर्सिटी उभारणार, फॉरेन्सिक युनिव्हर्सिटीचा प्रस्ताव.

- शिक्षणासाठी आणखी निधीची गरज, शिक्षण क्षेत्रात परदेशी गुंतवणूक आणणार, २०३० पर्यंत भारतात सर्वाधिक तरुण शिक्षित.

- २०१४ पर्यंत सर्व जिल्ह्यात जनौषधी केंद्र.

- आरोग्य क्षेत्रासाठी ६९ हजार कोटी.

- स्वच्छ भारतासाठी १२ हजार ३०० कोटी.

- महिला शेतकऱ्यांसाठी धन्य लक्ष्मी योजनेची घोषणा,याअंतर्गत महिलांना प्रामुख्याने बियाणांसंबंधी योजनांमध्ये जोडण्यात येईल.

- शेतीमधील नाशिवंत उत्पादनाच्या वेगवान वाहतुकीसाठी भारतीय रेल्वेच्या साहाय्याने किसान रेल्वे सुरु करणार.

- 'टीबी हारेगा, देश जितेगा' अभियान हाती घेणार.

- मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी पाऊल, सागर मित्र योजनेची सुरुवात करणार.

- कृषीकर्जासाठी १५ लाख कोटींची तरतूद.

- शेतमालाच्या निर्यातीसाठी कृषी उडान योजना सुरु करणार.

- २०२५ पर्यंत दूध उत्पादन दुप्पट करणार.

- नापीक जमीनीवर सौर उर्जा प्रकल्प उभारणार. 

- २० लाख शेतकऱ्यांसाठी सौग उर्जा योजना, कृषीपंपासाठी सौरउर्जेच्या वापरावर भर.

- शेतकऱ्यांसाठी वेअरहाऊस उभारणार, शेतकऱ्यांना गोदामं उभारण्यासाठी योजना.

- मेरा वतन, तेरा वतन, हमारा वतन... दुनिया का सबसे प्यारा वतन... निर्मला सीतारामन यांनी म्हटली कविता.

- कृषी आणि पशुपालन क्षेत्रासाठी तीन नव्या कायद्यांची निर्मिती.

- रासायनिक खतांच्या वापरांवर नियंत्रण ठेवणार; सेंद्रीय खतांच्या वापराला प्राधान्य देणार.

- सरकार देशातील १०० दुष्काळी जिल्ह्यांसाठी खास कार्यक्रम, व्यापक उपाययोजना प्रस्तावित करणार.

शेतकरी कल्याणासाठी १६ सूत्री कार्यक्रम हाती घेणार...

- मार्च २०१४ मध्ये केंद्र सरकारवर ५२.२% कर्जाचा बोजा. मार्च २०१९मध्ये हाच आकडा ४८.७ टक्क्यांनी कमी झाला आहे. 

 


ताज्या बातम्या