Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोना व्हायरस लक्षण आणि निदान

दि . 01/02/2020

'कोरोना व्हायरस' सध्या हे नाव सगळीकडे पसरत आहे. काय आहे हे कोरोना व्हायरस ...? कुठून आले हे.....?

'चीन' या देशातून हा व्हायरस आल्याचे समजत आहे. सध्या चीनच्या 'वुहान' शहरात आणि या देशात या कोरोना व्हायरसने थैमान मांडला आहे. आता हे व्हायरस फ्रान्स, अमेरिका, जपान, थायलंड, आणि इंग्लंडसह अजून बऱ्याच देशात पसरत चालला आहे. या व्हायरसाची लागवण खूप प्राणघातक आहे. ह्याचे विषाणू झपाट्याने वाढतात. हा एक नवीन व्हायरस असून सार्स severe acute respiratory syndrome (SARS) नावाच्या कोरोनाचे विषाणू पेक्षा हे विषाणू जास्त घातक आहे.

2002 -2003 साली सार्स नावाच्या विषाणूंमुळे 8,098 लोक संक्रमित झाले होते. ह्यात 774 लोकं मरण पावले. डिसेंबर 2019 च्या पहिल्या आठवड्यात नवीन कोरोना व्हायरस सापडला. त्याला कोरोनाचा नवा विषाणूंचा प्रकार घोषित केला गेला. या पूर्वी 6 अजून कोरोना व्हायरसची निश्चिती झाली असून सध्याच्या व्हायरसाचा हा 7 वा प्रकार आहे.

चिकित्सा परामर्श दात्यानुसार सगळेच कोरोना व्हायरस जीवघेणे आणि धोकादायक नसतात. पण तरी ही त्यांचे प्रकार गंभीर आहेत. हे व्हायरस सर्दीच्या विषाणूंसारखेच पसरतात. हे मानव आणि प्राणी दोघांना संक्रमित करतात. हे लवकर प्रसरण पावतात. लहान मुलांमध्ये या विषाणूंचे संसर्ग लवकर होते. ह्या व्हायरसच्या संसर्गामुळे श्वास घ्यायला त्रास होते. नाक वाहणे, खोकला होणे आणि घसा खवखवणे, आणि ताप येणे असे त्रास संभवतात. लहान मुलांच्या कानात संक्रमण होऊ शकते. फुफ्फुसात पसरल्यावर न्यूमोनिया होऊ शकतो. जास्त करून शारीरिक दुर्बळ असणारे, वृद्ध, हृदयरोगी, कमकुवत प्रतिकारक शक्ती असणारे ह्यांना या विषाणूची लागवण लवकर लागते.

कोरोना व्हायरस अनेक विषाणूंचा जाळ आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात. कोरून हे नांव त्यांचा क्राऊन सारख्या दिसणाऱ्या आकारांवरून पडले आहे. हे विषाणू सर्दी पडसेच्या विषाणूंसारखेच पसरतात. ह्यात शिंक येणे, खोकला येणे या सारखे लक्षण दिसतात. या व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून आले आहे. चीन देशात मिळणाऱ्या सी फूड मधून हे विषाणू पसरले आहे. हे विषाणू अजून जीवित प्राणी जसे वटवाघूळ, डुक्कर, पाळीव प्राणी जसे-चिमणी, मांजर, कुत्रे, उंट आणि मर्मोट्स (marmots) यांचा मुळे पसरत आहे.

हे सर्दी, पडसे, खोकला सारखे एका व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्ती पर्यंत पसरतात. शिंकल्या वर खोकल्यावर उडणारे विषाणू एकमेका पर्यंत जाऊन ह्याची लागवण होते. संक्रमित व्यक्तीच्या हाताला स्पर्श केल्याने त्याचा जवळ गेल्याने या विषाणूंची लगेच लागवण होते. कोरोना विषाणूची लागण झालेली एक व्यक्ती बर्‍याच लोकांना संक्रमित करू शकते. हा कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार असल्याने त्याच्या प्रसाराचे नेमके कारण कळण्यात आले नाही.

 

ह्या विषाणूंच्या लागवण असल्याची काही लक्षणे जाणून घेऊ या....

घसा खवखवणे, सर्दी, खोकला, ताप असणे हे त्याची प्राथमिक लक्षणे मानली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची मुख्य लक्षणे आहेत.

1-डोकेदुखीः दिवसभर डोकं जड होणे, सतत डोकेदुखी होणे.

2-वाहणारे नाक: सतत बरेच दिवस वाहणारे नाक आणि औषधोपचारानंतर पण नियंत्रित होत नसणे.

3-खोकला असणे: जास्त खोकला हे कोरोना व्हायरस संक्रमणाचे लक्षण असू शकते.

4-घसा खवखवणे: या संसर्गामुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तीचा घसा नेहमी खवखवतो.


ताज्या बातम्या