Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारे डॉक्टर, DK चौकातील डॉक्टरकडून अमानवतेचे दर्शन..

दि . 31/01/2020

मालेगाव: सोयगाव येथील एका ३ तीन वर्षाच्या मुलीची अचानक तब्बेत खराब झाल्याने त्या 3 वर्षीय बालिकेचे वडील त्या चिमुरडीवर लगेचच प्राथमिक उपचार उपचार व्हावा यासाठी दवाखाण्याच्या शोधात होते. दवाखाना शोधात असलेल्या पालकाला अचानक DK चौकातील एक खाजगी रुग्णालय सुरु दिसले आणि काहीही विचार न करता त्या पालकाने त्या डॉक्टर कडे आपल्या बालकाला नेले डॉक्टर होते व दवाखाना देखील चालू होता. पालकासाठी मुलीवर उपचार महत्वाचे होते म्हणून तो पालक तेथे सोयगावातील DK चौक येथील एका खाजगी रुग्णालय रात्री १०:१५ वाजता गेला अन तिथेच घडले अमानवतेचे दर्शन त्या क्लिनिक मध्ये जाताच त्या डॉक्टर च्या हाताखाली असलेल्या कंपाऊंडर ने चक्क नाकारले आणि सांगितले कि हि काही वेळ नाही दवाखान्यात यायची आता सव्वा दहा वाजले आहेत आता आम्ही घरी निघालो आहोत आता उपचार शक्य नाहीत. त्या चिमुरडीचा बाप निशब्दपणे समोर असलेल्या डॉक्टर कडे बघत होता. समोर उभे असलेले डॉक्टर काही म्हणतील असे त्या बापाला वाटले होते. पण, डॉक्टरनेही त्याच्या हाताखाली असलेल्या माणसाच्या शब्दाला दुजोरा दिला आणि आता शक्य नाही असे उत्तर दिले. निशब्द असलेल्या त्या चिमुरडीचा बाप लगेचच तेथून निघून गेला कारण त्याला त्या डॉक्टर आणि त्याच्या हाताखाली असलेल्या माणसाच्या विषयी खूप राग येत होता पण त्या बापासाठी त्या मुलीचा उपचार महत्वाचा होता. त्या बापाने लगेचच वेळ न वाया घालता दुसऱ्या दवाखान्यात घेऊन गेला. दुसऱ्या रुग्णालयात जाऊन त्या मुलीवर उपचार केलेत आता मुलगीही ठीक आहे पण, या घटनेवरून वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना आणि डॉक्टररी पेशाला कलंक असलेल्या अश्या डॉक्टरांवर कुणी नियंत्रण ठेवणारे असो वा नसो पण माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या अश्या डॉक्टर वैद्यकीय विभागाकडून कारवाही होण्याची मागणी परिसरातून होत आहे.

डॉक्टरच्या हाताखाली असलेला हा व्यक्ती राजकीय पक्षातील धडाडीचा कार्यकर्ता आहे.अश्या माणुसकीशून्य लोकामुळे पक्ष बदनाम होईलच याची काळजी पक्षनेत्यांनी घेण्याची गरज आहे.


ताज्या बातम्या