Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नामपूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध : आमदार दिलीप बोरसे ...

दि . 31/01/2020

मोसम खोऱ्याची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या नामपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले 
               
येथील ऐतिहासिक झेंडा चौकात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक सावंत, उपसरपंच जयश्री सावंत, माजी सरपंच कविता सावंत, प्रमोद सावंत, अश्पाक पठान, किरण अहिरे, जीभाऊ मोरे,त्रंबक सोनवणे, किरण माळी, सोनाली निकम, पुष्पा मुथा, रंजना मुथा, कल्पना सावंत, सरला सोनवणे, करुणा अलई, कलाबाई माळी, संभाजी सावंत,  ग्रामविकास अधिकारी के बी इंगळे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरपंच अशोक पवार यांच्या हस्ते आमदार दिलीप बोरसे यांचा सत्कार करण्यात आला. आमदार बोरसे यांच्या हस्ते देना बँक ते लोहार गल्ली, गलांडे गल्ली, अंबिका साडी सेंटर, गोडावून गल्ली आदीं ठिकाणी रस्ता कांक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच इंदिरा नगर येथे पीव्हीसी पाइप गटार बांधणे, अंगणवाडीस संरक्षक भिंत बांधणे, राममंदिर येथे गटारीचे बांधकाम करणे आदी कामांचे भूमिपूजन यावेळी झाले. नामपूर शहराच्या विकासासाठी प्रशासकीय पातळीवर झटणारे आदर्श ग्रामसेवक के बी इंगळे यांचे कामकाज आदर्शवत असल्याचे गौरोद्गार आमदार बोरसे यांनी यावेळी काढले.


ताज्या बातम्या