Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मेशी येथे झालेल्या अपघातस्थळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट ; पंतप्रधानांनी देखील व्यक्त केला शोक..

दि . 29/01/2020

देवळा प्रतिनिधी राकेश आहेर : देवळा ते सौंदाणे महामार्गावर काल तीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला होता, बससह रिक्षा विहिरीत गेल्याने 26 लोकांचा मृत्यू झाला तर ३५ गंभीर जखमी झाले आहेत त्यांचा उपचार सामान्य रुग्णालय मालेगाव तसेच ग्रामीण रुग्णालय देवळा येथे सुरू आहे. काल रात्री उशिरापर्यंत तसेच आज सकाळी बारा वाजेपर्यंत विहिरीत मृतांची शोध मोहीम सुरू होती.
   त्यानंतर घटनास्थळी आरती सिंह पोलीस अधीक्षक ग्रामीण व आय.जी. चार्लीग डोर्जे यांनी घटनास्थळी पाहणी केली.
  *विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद घेण्यात आली*_घटनास्थळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेऊन स्थानिकांशी चर्चा केली, त्यानंतर दरेकर म्हणाले की शासनाने अपघातात मृत्यू झालेल्यांना दहा लाख रुपये मदत जाहीर केलेली आहे, पण दहा लाख काय पंचवीस लाख रुपये जरी दिले तरी मृत झालेल्यांचे मोल होऊ शकणार नाही. त्यामुळे जे मृत पावले त्यांच्या घरी कमावते कोणी आहे का? आणि कमावते नसेल तर त्यांच्या कुटुंबाची दीर्घकालीन काळजी घेणारी गोष्ट शासनाने करावी. अनिल परब यांच्याशी बोलून परिवहन खात्यामध्ये नोकरी देण्याचा प्रयत्न करू, अपघात कोणत्या कारणामुळे झाला याच्या मुळापर्यंत जाऊन आणि असे अपघात कसे टाळता येईल याबद्दल उपायोजना करू. यापुढेही काही अत्यावश्यक गोष्टी लागल्या तर तत्काळ मृतांच्या कुटुंबांना तसेच जखमींना तत्काळ देण्याचा प्रयत्न करू. यावेळी चांदवड देवळा चे विद्यमान आमदार डॉ.राहूल आहेर, व भारतीय जनता पार्टीचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव हजर होते.
  या घटनेचा मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही या घटनेचा शोक व्यक्त केला आहे.


ताज्या बातम्या