Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा आमदार दिलीप बोरसेंच्या हस्ते सत्कार

दि . 29/01/2020

नाशिकच्या मातीत घडलेला कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरल्याने "मटा संवाद" कार्यक्रमात जिल्ह्यातील पैलवान आमदार दिलीप बोरसे व राहुल ढिकले यांच्या वतीने पैलवान हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार करण्यात आला.

 नाशिक येथील मविप्रच्या कर्मवीर बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे "मटा संवाद" कार्यक्रमाचे  आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार दिलीप बोरसे व आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी किताब पर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला.

 आमदार दिलीप बोरसे यांनीही आपल्या भाषणात प्राथमिक शाळेपासून कुस्तीची आवड असल्याचे सांगत महाविद्यालयात शिक्षण घेत असताना "युनिव्हर्सिटी चॅम्पियन" झालो असल्याची आठवण करून देत कुस्तीतून नावलौकिक मिळाल्यामुळेच दोन वेळा बागलान तालुक्याने मला आमदारकी बहाल केल्याचे आमदार बोरसे यांनी सांगितले.

यावेळी दैनिक महाराष्ट्र टाइम्स चे संपादक शैलेंद्र तनपुरे, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचे प्रशिक्षक गोरखनाथ बलकवडे, रवींद्र मोरे, डॉ.मोरे, प्राचार्य देसले आदींसह अभियांत्रिकी विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्या