Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पत्नीचा गळा चिरून तिची हत्या करत पतीनेही स्वतः गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली ; चांदवड येथील घटना..

दि . 29/01/2020

चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय निवासस्थानातील घटना..

अनिता जाधव असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव असून चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती..

तिच्या पतीचे नाव शिवराम जाधव असे होते.या घटनेनंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून हत्या व आत्महत्या का झाली याचा तपास सुरू आहे..


दरम्यान, चारित्र्याचा संशय घेत चांदवड तालुक्यातील शेतमजूर असलेले नितीन बकाजी कडनोर  यांनी आपल्या पत्नी सुनीता नितीन कडनोर  हिच्या डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून तीला यमसदनी पाठविले तर स्वताही इंदूर - पुणे महामार्गावर धावत्या वाहणासमोर स्वतःला झोकून घेत आत्महत्या केली होती ही घटना मनमाडजवळील चांदवड तालुक्यातील दहेगाव या गावात काल  घडली होती.आज पुन्हा त्याच घटनेचा प्रत्यय आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे...


ताज्या बातम्या