Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावमधील अपघातात मृतांचा आकडा 25, तर 33 जण जखमी; मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर

दि . 29/01/2020

मालेगाव तालुक्यात एसटी बस-ऑटो रिक्षा यांच्या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाले आहेत

 मालेगाव तालुक्यातील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात झालेल्या बस आणि रिक्षा अपघातातील मृतांचा आकडा 25 वर गेला आहे तर 33 जण जखमी आहेत. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. अपघातातील जखमींवर सध्या मालेगावातील जिल्हा रुग्णालयासह इतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तर रिक्षामधील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत केली जाईल असं आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

मालेगाव-देवळा रोडवरील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर एसटी बस आणि रिक्षा दोन्ही वाहनं थेट विहिरीत कोसळली होती. त्यानंतर पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. या अपघातात बस आणि रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला आहे.


ताज्या बातम्या