Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पत्रकार मनोहर शेवाळे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

दि . 28/01/2020

मालेगाव : सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांच्या दैनिक बालेकिल्ला प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक गौरव पुरस्कार दळून गौरवित असते. यंदा देखील मालेगाव येथील कृष्णा लॉन्स येथे बालेकिल्ला प्रतिष्ठानचा वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तसेच सामाजिक प्रश्नांना आपल्या लेखणीद्वारे वाचा फोडल्याबद्दल कसमादे इलेक्ट्रॉनिक आप चे संपादक, तसेच जय महाराष्ट्र न्युज चॅनेल चे मालेगाव जिल्हा प्रतिनिधी मनोहर शेवाळे यांचा यावेळी बालेकिल्ला सामाजिक गौरव पुरष्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बालेकिल्ला चे संपादक निवृत्ती बागुल, विवेक बागुल, पत्रकार हेमंत धामणे, योगेश बच्छाव, कल्पेश बागुल, सामीर दोषी, हेमंत ठाकूर आदी उपस्थित होते.


ताज्या बातम्या