Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
तळवाडे सरपंचपदी शिवसेनेचे युवराज खैरनार

दि . 28/01/2020

मालेगाव : तळवाडे (ता.मालेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेचे युवराज सुखदेव खैरणार यांची सरपंचपदी निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. शेवाळे यांनी काम पाहिले. ग्रामविकास अधिकारी साहेबराव कोर व तलाठी सुनील हिरे यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य  समाधान  शिरोळे, संजय पवार, सुदाम साळुंखे, मंगला केले, शंकूतला बाळू पवार, शोभा लक्ष्मण जाधव, अलकाबाई  प्रल्हाद आहिरे आदी उपस्थित होते. नवनियुक्त सरपंच युवराज खैरनार यांचा कृषिमंत्री दादा भुसे व युवासेना विस्तराक आविष्कार भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध संघटना व नगरसेविका आशाताई अहिरे, व  प्रकाश अहिरे यांनी देखील श्री.खैरनार यांचा सत्कार केला. यावेळी मोहन खैरनार, सागर खैरनार आदी उपस्थित होते. 


ताज्या बातम्या