Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
द्याने येथील उत्कर्ष शाळेत ध्वजारोहण

दि . 27/01/2020

मालेगाव : शहरालगतच्या द्याने येथील उत्कर्ष प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाबराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर नगरसेविका छाया शिंदे यांनी ध्वजपूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधत शाळेच्या नव्या इमारतीच्या जागेचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक रोहित चव्हाण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


ताज्या बातम्या