Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शाह विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभातफेरी

दि . 27/01/2020

मालेगाव- येथील वर्धमान शिक्षण संस्था संचलित ,सौ.कां.र.शाह प्राथमिक शाळेत  प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आली यावेळी विद्यार्थ्याची संगमेश्वर परिसरातुन प्रभात फेरी काढण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांच्या घोषणा,लेझीम पथक,बँड पथक यामुळे चैतन्यपूर्ण बनले होते. संस्थेचे अध्यक्ष अशोक पटणी व उपाध्यक्ष  परेश शाह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संविधान वाचन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. बालवर्ग ते  सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केलीत त्यानंतर सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून भारतीय संस्कृती, शेतकऱ्याची व्यथा तसेच नरवीर तानाजी मालुसरे आदी विषयावर भाषणे केली. यावेळी विनोद शाह, प्रकाश शाह, प्रकाश  शाह, भालचंद्र पारेख, प्रकाश पाटणी, अभय शाह, प्रताप शाह, गौतम  शाह, गौतम शाह,  शिरीष पटणी, पद्मेश मेहता,शरद पटणी, प्रदीप शाह,  प्रदीप मर्चंट, वीरेंद्र शाह, नितीन शाह, भाग्येश पटणी, अशोक शाह, दिपक शाह, नंदकुमार पटणी, मुख्याध्यापक नितीन ठाकरे   तसेच माता पालक संघाच्या सदस्या,पालक शिक्षक संघाचे सदस्य,व्यवस्थापन समिती सदस्य  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. गुंजाळ  व श्री. जोशी यांनी केले.


ताज्या बातम्या