Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
देवळा व परिसरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा..

दि . 26/01/2020

प्रतिनिधी राकेश आहेर: आज दिनांक 26 जानेवारी रोजी 7० वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. देवळ्यासह मेशी, दहिवड, उमराणा ,डोंगरगाव. महालपाटणे निंबोळा, या गावांमध्ये प्रजासत्ताक दिन मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले, तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी नवीन व्यवसायांना सुरुवात करण्यात आली. 
   तसेच मेशी तालुका देवळा येथील जनता विद्यालय व जुनिअर कॉलेज मेशी येथे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला,तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या वर्षभरातील कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला, मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देण्यात आल्या. तसेच सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषेत ध्वजाला मानवंदना देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

स्वागतभारतीय प्रजासत्ताक दिनाचे..... ध्येय समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाचे
   मा. मुख्यमंत्री, राज्यपाल, पर्यावरण विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, व राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार सर्व ग्रामपंचायत शाळा,कॉलेज यांना संविधानात्मक शपथ देण्यात आली ती पुढील प्रमाणे:-माझ्या दैनंदिन जीवनशैलीत माझ्याकडून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेईन, पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे त्याची बचत करेन, ओल्या कचऱ्याचे सेंद्रिय खत करेन, नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेईन, नैसर्गिक अधिवासात वास्तव करणारे प्राणी, पक्षी, जलचर व जैवविविधता यांचे संरक्षण करेन. तसेच प्रत्येक वर्षी एक तरी झाड लावेन अशी शपथ आज शालेय विद्यार्थी व नागरिकांनी घेतली.


ताज्या बातम्या