Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मित्रांच्या मदतीने सावत्र आईची हत्या ; स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आरोपींच्या मुसक्या...

दि . 25/01/2020

मालेगाव :- सावत्र आई त्रास देते म्हणनू मुलाने मित्राच्या साह्याने सुपारी देऊन केला खून , पोलिसांनी सावत्र मुलगा मनोज डोंगरे सह 5 जणांना केली अटक , 16 जानेवारीला भयगाव शिवारात ज्योती डोंगरे या महिलेचा दिवसा घरात घुसून गोळ्या झाडून करण्यात आला होता खून.

मालेगावच्या भायगाव शिवारात भरदिवसा महिलेची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून , आई त्रास देते म्हणून सावत्र मुलानेच सुपारी देत आईची हत्या उडवून आणल्याची समोर आले असून, पोलिसांनी सावत्र मुलासह सात जणांना अटक केली आहे.त्यात दोन पोलीसपुत्रांचाही समावेश असल्याचे समजते.
मालेगावच्या भायगाव शिवारातील संविधान नगर भागात 16 जानेवारी रोजी भरदिवसा ज्योती भट्टू डोंगरे या महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आल्याने.मालेगाव शहर हादरून गेले होते. अज्ञात मारेकऱयांनी पिस्टलमधून गोळ्या झाडून पलायन केल्याने पोलिसांना समोर मोठे आव्हान उभे राहिले होते.अखेर स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर खाकुर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे असता सावत्र मुलानेच आई त्रास देते म्हणून सावत्र मुलगा मनोज डोंगरे याने मारेकऱ्यांना सुपारी देत आईचा खात्मा केल्याची कबुली दिली.पोलिसांनी सावत्र मुलासह सात जणांना ताब्यात घेतले.
या तपासकामी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.पाटील, सपोनि सागर शिंपी, संदीप दूनगहू, सपोउनि सुनील अहिरे, पो.ह. सुहास छत्रे, वसंत महाले, राकेश उबाळे, चेतन संवत्सरकर, देवा गोविंद, हरीश आव्हाड, रतिलाल वाघ, फिरोज पठाण, प्रदीप बहिरम, संदीप लगड आदींचा सहभाग होता.
याप्रकरणी पोलिसांनी सावत्र मुलगा मनोज भटू डोंगरे (२८) यासह त्याचे साथीदार प्रकाश भिला निकम उर्फ पका (३४) रा. सानेगुरुजी मालेगाव, जितेंद्र बाबुराव कास उर्फ राजपूत (४०) रा. मुक्ताई कॉलनी, भायगाव मालेगाव, रवींद्र दादाजी अहिरे (२७) रा. इंदिरानगर, चंदनपुरी ता. मालेगाव, रवी रमेश पावरा (३०) रा. पंचरंगा कॉलनी धुळे, संजय सरदार पावरा (४०) रा.आंबे ता. शिरपूर जि. धुळे तसेच सागर अनिल रंगारी (२७) रा.मोतीबाग नाका, मालेगाव या आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.


ताज्या बातम्या