Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते पठावे दिगर गटातील विविध विकासकामांचा शुभारंभ..

दि . 25/01/2020

बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटातील विविध विकास कामांचा शुभारंभ बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. पठावे दिगर गटाचे जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या वाघंबा,गोळवाड,पठावे व कोदमाळ येथील पाझर तलाव दुरुस्ती व हनुमंतपाडा,जामन्याचा पाडा, परशुराम नगर, मानूर, गोळवाड, खैराडपाडा येथे सिमेंट बंधारे कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

 राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत केळझर येथील पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ देखील आमदार बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केळझरच्या सरपंच चंद्रभागा बहीरम, उपसरपंच काशिनाथ ठाकरे, पोलीस पाटील जगन देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, बाजार समितीचे संचालक तुकाराम देशमुख,भिलदरचे सरपंच शिवदास आहिरे आदींसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार बोरसे यांनी संबंधित ठेकेदारांना कामाचा दर्जा व्यवस्थित ठेवून आतापर्यंत जे झालं ते विसरा आणि गोरगरीब जनतेची प्रामाणिक सेवा करा असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.


ताज्या बातम्या