Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शिव थाळी योजनेचा २६ ला शुभारंभ ; कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन..

दि . 24/01/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सकाळी ११ वाजेला महाराष्ट्र शासन योजनेअंतर्गत शिव थाळी योजनेचा शुभारंभ व उद्घाटन सोहळा कृषी मंत्री ना. दादा भुसे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समितीचे माजी संचालक बंडू काका बच्छाव यांनी दिली.

येथील बाजार समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बच्छाव यांनी या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी समितीचे उपसभापती सुनील देवरे, सचिव अशोक देसले उपस्थित होते. गरीब व गरजू लोकांना १० रुपयात जेवण या संकल्पनेवर आधारित शिव थाळी योजनेचा संपूर्ण राज्यात २६ जानेवारी पासून शुभारंभ होत असून मालेगाव येथील बाजार समितीत शुभारंभ होणाऱ्या या योजनेचे उद्घाटन कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे माजी संचालक बंडू काका बच्छाव तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी नरसिंह कर, तहसीलदार चंद्रजित राजपूत, जय आनंद ग्रुप मित्र परिवाराचे पवन टी बडे वाल, पिंटू कर्णाव ट आदी उपस्थित राहणार आहेत.


ताज्या बातम्या