Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शिक्षित आत्महत्या करीत असेल तर ते शिक्षणाचे अपयश : बागुल

दि . 24/01/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- माणसाचे निम्मे आयुष्य शिक्षणासाठी जाते, शिक्षणाने आपल्या जीवनात आत्मविश्वास निर्माण होऊन पुढील जीवन समर्थपणे जगता आले पाहिजे. मात्र शिक्षण घेऊनही शिक्षित शेतकरी, युवक आत्महत्या करीत असतील तर ते शिक्षणाचे फार मोठे अपयश मानले पाहिजे. यामुळे शिक्षणाच्या उद्दिष्टात मोठे बदल केले पाहिजेत, असे उदगार ज्येष्ठ पत्रकार भगवान  बागुल यांनी काढले.                     

येथील गुरुवर्य बोवा दादा प्रतिष्ठान, ज्ञानेश्वर माऊली सार्वजनिक वाचनालय व गुरुवर्य दादासाहेब बुवा शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण तपस्वी दोधू आनंदा बोवा यांची ११३ वी जयंती बोवा दादा ज्ञान संजीवन समाधी येथे संपन्न झाला. त्यावेळी बागुल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दगेसिंग राजपूत होते. यावेळी बागुल म्हणाले,  गेल्या वर्षी पूर्ण देशात वीस हजाराहून अधिक शेतकरी व युवकांनी आत्महत्या केल्यात. शिक्षणाने फक्त शिक्षित होण्याऐवजी त्याला शहाणपण आले पाहिजे. माणूस आयुष्यातील थोड्याशा संकटाने घाबरून आत्महत्या करीत असेल, तर त्या शिक्षणाचा काय उपयोग? आत्मविश्वासाचे पाठबळ हेच शिक्षणाचा मूळ उद्देश आहे याची शिकवण कै. बोवा दादांनी दिली. विद्यमान समाजव्यवस्थेत गरीब-श्रीमंतातील दरी वाढत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तनाचे जे  स्वप्न बोवा दादांनी पहिले होते त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत.                                  कार्यक्रमाचे अध्यक्ष दरेसिंग राजपूत यांनी बोवा दादांच्या काही आख्या यिका सांगितल्या. टी.एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. निंबा बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी साहित्य संघाचे अध्यक्ष रमेश उचित, आर.पी.तापडे, बी.एम.डोळे, एस.डी. खरे, उद्योगपती बन्सी कांकरिया, चित्रा हिरे, आशा खरे आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्या