Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
महाराष्ट्र बंदला मालेगावमध्ये समिश्र प्रतिसाद

दि . 24/01/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- केंद्र सरकारने लागू केलेला
नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवार दि.२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला मालेगावी समिश्र प्रतिसाद मिळाला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीतर्फे येथील राष्ट्रीय एकात्मता चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजीत स्मारकापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चाकऱ्यांच्या हातात सीएए व एनआरसीला विरोध दर्शवणारे फलक होते. मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सीएए कायदा, एनआरसी व एनपीआर प्रक्रीये विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला मालेगावी समिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील कॅम्प, सोयगाव, कलेक्टर पट्टा, संगमेश्वर तसेच पूर्व भागात देखील जनजीवन सुरळीत होते. बस, रिक्षासेवा सुरळीत सुरु होत्या. शाळा, महाविद्यालय, व्यापारी संकुल, दुकाने सुरळीत सुरु असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी मोर्चात बिपीन पटाईत, किरण खरे, शैलेन्द्र गायकवाड, मुकीम मीनानगरी, विशाल खरे, संतोष अहिरे, रुपेश पटाईत, मनोज अहिरे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे यांनी कार्यकर्त्यासह निवेदन दिले.


ताज्या बातम्या