Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील - आमदार दिलीप बोरसे 

दि . 24/01/2020

नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी आपण सदैव कटिबध्द राहू असे प्रतिपादन आमदार दिलीप बोरसे यांनी नामपूर येथे बाजार समितीत झालेल्या शेतकरी मेळावा व सत्काराप्रसंगी बोलत होते.
    
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य प्रा.गुलाबराव कापडणीस उपस्थित होते यावेळी भावराव सावंत,सरपंच अशोक पवार, सभापती हेमंत कोर,उपसभापती चारूशीला बोरसे, उत्तम सावंत,पो.पाटील बाजीराव सावंत,भाजपा तालुकाध्यक्ष संजय देवरे, माजी भाजपा तालूकाध्यक्ष संजय भामरे, सभापती राजेंद्र अलई,काकडगाव सरपंच संजय पवार,आखतवाडे सरपंच अशोक अहिरे,विनोद सावंत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
       
आमदार बोरसे यांनी सांगितले कि बाजार समितीत शेतकरी हा प्रमुख घटक असून  संचालक मंडळाने शेतकरी हिताचे निर्णय घेऊन विकासाची कास धरावी तालुक्याचा आमदार या नात्याने आपले प्रश्न शासनदरबारी मांडण्याचा सदेव प्रयत्न राहील.संचालक मंडळाने आपली भुमिका चोख बजावली पाहिजे असे नमूद केले.यावेळी सभापती हेमंत कोर,उपसभापती चारूशीला बोरसे, संचालक कृष्णा भामरे,संजय भामरे,भाऊसाहेब आहिरे,शांताराम निकम,लक्ष्मण पवार,आनंदा मोरे,भाऊसाहेब कांदळकर,दादाजी खैरनार, अविनाश सावंत,दिपक पगार,मधुकर चौधरी, चंद्रभागाबाई शिंदे,अविनाश निकम,सचिन मुथा,दत्तु बोरसे,सचिव संतोष गायकवाड, उपसचिव अरूण अहिरे, नकुल सावंत,प्रविण सावंत यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्या