Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
देवळा येथील जाणीव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या प्रथम वर्धापन दिन साजरा..

दि . 23/01/2020

देवळा- राकेश आहेर: देवळा येथे विविध पतसंस्था आहेत. त्यापैकी एक जाणीव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मागील वर्षी २३ जानेवारी २०१९ रोजी खुंटेवाडी चे उपसरपंच भाऊसाहेब निंबा पगार यांनी स्थापन केली. या पतसंस्थेचा  आज पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी सत्यनारायण व महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असल्याने नेताजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

   यावेळी जाणीव पतसंस्थेचे संस्थापक भाऊसाहेब पगार, चेअरमन जितेंद्र अण्णा आहेर, व्हा  चेअरमन राजीव पगार, संपूर्ण संचालक मंडळ तसेच कर्मचारी मंडळ यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. 
  
   यावेळी शरदराव पवार पतसंस्थेचे चेअरमन योगेश आंबा आहेर, किशोर सूर्यवंशी पतसंस्थेचे चेअरमन व संचालक प्रदीप आबा अहिरे, रामराव आहेर पतसंस्थेचे चेअरमन पवन अहिरराव, तसेच एम. देवरे सर, व्ही.बी.आहेर, सुधाकर आहेर, डॉक्टर निकम, सचिन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
*दि.२२/१/२०२० अखेर सांपत्तिक स्थिती*
*खेळते भांडवल-५,८६,५९,६३०
*सभासद भागभांडवल-२६,९६,०००
*स्वनिधी-६,७७,४२५
*सर्वप्रकारचे ठेवी-५,२५,८६,१७१
*कर्जवाटप-३,४५,१५,८८६
*सी.डी.रेशो-६४.३८
*गुंतवणूक-१,५०,०००


ताज्या बातम्या