Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मेशी येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांची राज्यपातळीवर भरारी..

दि . 22/01/2020

देवळा प्रतिनिधी राकेश आहेर-केंद्र सरकारने शालेय विद्यार्थी विज्ञान शास्त्रीय संशोधनाकडे आकर्षित होण्याची प्रेरणा मिळावी म्हणून राज्यपातळीवर इन्स्पायर अवार्ड नावाची योजना गेल्या काही वर्षापासून सुरू केली आहे पहिल्या टप्प्यात जिल्हा पातळीवर विज्ञान उपकरणांची निवड होते. त्यातून राज्यपातळीवर विज्ञान प्रदर्शन भरवले जाते.

   राज्य पातळीवरील प्रदर्शनातून अखिल भारतीय पातळीवर प्रदर्शन भरून त्यातून सर्वोत्तम उपकरणांची निवड केली जाते. चालू वर्षी संदीप फाउंडेशन नाशिक येथे १६ ते १८ जानेवारी रोजी हे प्रदर्शन भरले होते.त्यात जिल्हा स्तरातून मोठ्या प्रमाणात माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यात मेशी ता देवळा येथील इयत्ता नववी तील विद्यार्थी वैभव अहीरे याने विज्ञान शिक्षक निकम आर.बी.यांच्या मार्गदर्शनाखाली फ्युचर ग्रीन हायवे हे उपकरण तयार केले होते. या उपकरणाची राज्यपातळीवर निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्याध्यापक ,विज्ञान शिक्षक, वैभव आहीरे चे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

*काय आहे फ्युचर ग्रीन हायवे उपक्रम*:_या उपकरणाच्या सहाय्याने मुंबईतील रहदारीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच हायवेवर होणारे प्रदूषण एक कनेक्टर च्या साह्याने जमा करून जंगलक्षेत्रात हा वायू सोडण्यात येणार होता. तीन किलोमीटर अंतरापर्यंत स्वयंचलित रस्ते तयार करण्यात आले होते. जेणेकरून वाहने रस्त्यावर उतरणार नाहीत व इतर प्रश्न सुटतील. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षापासून मेशी शाळेच्या उपकरणांची राज्य पातळीवर निवड होत आहे.


ताज्या बातम्या