Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मोसम नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह

दि . 22/01/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- येथील कॅम्प भागातील कॅम्प गणेश कुंडालगत असलेल्या मोसम नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून पंचनामा कामी कॅम्प पोलिसांच्या स्वाधीन केला.

काल मंगळवार दि.२१ रोजी दुपारी १२ वाजे च्या दरम्यान कॅम्प पोलिसांना येथील कॅम्प भागातील गणेश कुंडालगत असलेल्या मोसम नदी पात्रात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. कॅम्प पोलिसांनी याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी संजय पवार यांचेशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार पवार यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या जवानांनी या अज्ञात इसमाचा मृतदेह अथक प्रयत्नानंतर नदी पात्रातून बाहेर काढला. या इसमाची ओळख पटली नसून अग्निशमन दलाच्या जवानांनी पंचनामा कामी सदर मृतदेह कॅम्प पोलिसांच्या स्वाधीन केला असल्याची माहिती दलाचे जवान सुधाकर अहिरे यांनी दिली. मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या तुकाराम जाधव, अमोल जाधव, संदीप सुळे, महेश सांगळे, हरीश गायकवाड, सुनील पवार, विवेक जाधव, जीवन अहिरे, ईश्वर अहिरे आदींनी प्रयत्न केले.


ताज्या बातम्या