Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शहर व तालुक्यातील रस्त्यांची व पुलांची कामे  निकृष्ट दर्जाची ; बांधकाम विभागाच्या कामाची चौकशी करा..

दि . 22/01/2020

मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे गेट बंद आंदोलन

मालेगाव (प्रतिनिधी) :- शहर व तालुक्यातील रस्त्यांची व पुलांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाली असून या कामांची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी येथील मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने नामपूर रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेट बंद आंदोलन करण्यात आले.

मंगळवार दि.२१ रोजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात सदर गेट बंद आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत गंभीर आरोप करताना ठाकरे की, शहर व तालुक्यातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असून शासनाच्या पैशांचा अयोग्य पद्धतीने वापर केला जात आहे. रस्ते बांधणीचे निकष पाळले जात नसून बांधकाम अभियंता या कामांची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष जात नाहीत. यामुळे शहरातील व तालुक्यातील  रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे नागरिकांना नाहक याचा त्रास सहन करावा लागत आहे. आ यावेळी आंदोलनकर्त्यांना आंदोलन करण्यास मज्जाव करण्यात आल्याने आंदोलक संतप्त झाले होते. अखेर उपकार्यकारी अभियंता राहुल पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून सन २०१७ ते २०१९ दरम्यान तालुक्यातील रस्ते व पुलांच्या कामांची माहिती येत्या आठ दिवसात देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. येत्या आठ दिवसांत माहिती न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ठाकरे यांनी यावेळी दिला. या आंदोलनात सतीश पगार, केदा जगताप, रामभाऊ हाके, ईश्वर केदारे, भाऊसाहेब सूर्यवंशी आदींसह तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.


ताज्या बातम्या