Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन..

दि . 22/01/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येथील आर.बी.एच. कन्या विद्यालयात मालेगाव मध्य विधान मतदार संघाच्यावतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रांगोळी प्रदर्शनास नायब तहसीलदार डाॅ.धर्मेंद्र मुल्हेरकर यांनी भेट देऊन रांगोळ्यांची पाहणी केली व विद्यार्थीनींचे कोतुक केले. यावेळी प्राचार्या ए.जे.जोंधळे यांनी स्पर्धेची माहिती दिली.

'दि.२५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणाऱ्या मतदार दिनानिमित्त येथील मालेगाव मध्य मतदार संघात विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन प्राताधिकारी विजयानंद शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली शाळा व महाविद्यालयात करण्यात आले असल्याची माहिती डाॅ. मुल्हेरकर यांनी दिली.
'मतदार असल्याचा अभिमान, मतदानासाठी सज्ज' असे कार्यक्रमाचे घोषवाक्य असून यानिमित्ताने विविध कार्यालये व आस्थापनेवर येथे शपथ दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 
याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर.जी.पाटील, पर्यवेक्षक श्रीमती के.डी.पवार, श्रीमती पी.सी.पाटिल. कलाशिक्षक के.एस.पठाण आदी उपस्थित होते.


ताज्या बातम्या