Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या मालेगावच्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक..

दि . 22/01/2020

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मालेगाव (प्रतिनिधी) :- इगतपुरी तालुक्यातील ग्रामस्थांतर्फे मागील आठवड्यात आयोजित महाराष्ट्र केसरी विजेते हर्षवर्धन सदगीर यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी झालेल्या गर्दीचा
फायदा घेत एका व्यापाऱ्याच्या पॅन्टच्या खिशातील दोन लाख रूपये चोरणाऱ्या मालेगावच्या दोघा सराईत गुन्हेगाराना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीचे दिड लाख रूपये व गुन्ह्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार असा ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

केसरी विजेते हर्षवर्धन सदगीर यांचा इगतपुरी तालुक्यात सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात सराईतानी नांदगाव सदो, ता. इगतपुरी येथील व्यापारी प्रशांत नारायण कडू यांचे पॅन्टचे खिशातील दोन लाख रुपये चोरून नेले होते. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे, पोलीस हवालदार रवींद्र वानखेडे, बंडू ठाकरे, शिवाजी जुंदरे, संदिप हांडगे, सचिन पिंगळ, गिरीष बागूल, प्रदीप बहिरम हे सदर गुन्ह्यचा समांतर तपास करत असताना घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेजची पडताळणी करत असताना त्यांना मिळविलेल्या गुप्त माहितीचे आधारे त्यांनी मालेगाव शहरातील अब्दुल रेहमान उर्फ नाट्या मोहमद फारुख नवा आझादनगर व हमीद अली उर्फ दलीया मोहमद उमर रा. रोशनाबाद, तडवी नगर या मालेगावातील दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता साथीदार बिलाल खान याच्यासह गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांचे कब्जातून चोरीस गेलेले दिड लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार क्र. एमएच ०५ बीएस १०२७ असा एकुण ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सराईत गुन्हेगारांकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपींचा साथीदार बिलाल खान याचा स्थागुशाचे पथक कसोशीने शोध घेत आहे.


ताज्या बातम्या