Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला जाणार हजारो युवक.

दि . 20/01/2020

मालेगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन येत्या दि. 23 जानेवारीला नेस्को सेंटर, गोरेगाव (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाची सद्यास्थितीतील भूमिका व भविष्यातील वाटचालीवर बोलणार आहेत, महाराष्ट्र धर्मातून हिंदवी स्वराज्याचा निर्धार यावेळी मांडला जाणार आहे. साहेबांचे हे विचार ऐकण्यासाठी मालेगाव शहर व तालुक्यातून मोठ्या संख्येने मनसैनिक व युवक जाणार आहेत.
सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अधिवेशन चालणार आहे. त्यात मालेगावातून जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेचे शहराध्यक्ष राकेश भामरे यांनी केले आहे. गुरुवारी (दि.23) पहाटेच अधिवेशनासाठी प्रयान केले जाणार आहे. त्यानुसार कार्यकर्ते व तरुणांनी उपस्थित राहावे, असेही त्यांनी नमूद केले आहे.


ताज्या बातम्या