Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
ट्रॅकरच्या रोटर मध्ये अडकून एकाचा मृत्यू ; मालेगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार..

दि . 18/01/2020

रोटरमध्ये खेचला गेल्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

मालेगाव (प्रतिनिधी) :- ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकल्याने तालुक्यातील मळगाव येथील एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोक पसरली आहे.

तालुक्यातील मळगाव येथील तरुण शेतकरी अमोल विठ्ठ्ल भोसले (३२) हा सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या शेतात कांदे लागवडीसाठी शेत जमिनीत रोटर फिरवीत असताना अचानक  रोटरमध्ये खेचला गेल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अमोलचा मृतदेह काढण्यात यश मिळाले.


ताज्या बातम्या