Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
टोकडे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण ; ग्रामस्थांचे उपोषण सुरूच

दि . 16/01/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीने गावातील विविध विकास कामांमध्ये केलेल्या अपहाराची चौकशी करून कारवाई करावी तसेच अपहाराची रक्कम विनाविलंब प्रचलित नियमानुसार संबंधित दोषी कडून वसूल करावी या प्रमुख मागणीसाठी विठोबा द्यानदयान यांच्या नेतृत्वात तोकडे ग्रामस्थांनी येथील पंचायत समिती प्रवेशद्वारासमोर मंगळवार दि. १४ पासून सुरु केलेले लाक्षणिक उपोषण हे बुधवारी दुसऱ्या दिवशी देखील सुरू होते.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची चर्चा केली. तसेच लेखी देऊन ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार गावात प्रत्यक्ष भेट देऊन अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित अहवाल सादर केला आहे. मात्र हा अहवाल ग्रामस्थांनी फेटाळून लावला असून या उपोषणास संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेअंती त्रयस्थ यंत्रणेमार्फत याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी केले आहेत. त्यामुळे त्रयस्थ समितीची नेमणूक होऊन पुढील चौकशी होईस्तोवर ग्रामस्थांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती करण्यात आली.

मात्र केवळ चौकशी करून अहवाल द्यावा अशी आमची मागणी नसून गावातील विकास कामासंदर्भात आम्ही सादर केलेल्या कागदपत्रांच्या पुराव्या आधारे कारवाई व्हावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. मात्र प्रशासन वेळकाढूपणा करत असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन युद्धपातळीवर या प्रकरणाची चौकशी करावी. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुचविलेल्या त्रयस्थ समिती स्थापने संदर्भातील सत्यप्रती मिळाल्यानंतरच उपोषण मागे घेण्याबाबत विचार केला जाईल असे ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासनाने सांगितले. त्यामुळे ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम असल्याने ही उपोषण दुसऱ्या दिवशी देखील सुरू होते.


ताज्या बातम्या