Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात विद्यार्थ्यांचे कँडल मार्च

दि . 16/01/2020

नागरिकत्व दुरुस्ती कायदा, नागरिकत्व नोंदणी प्रक्रिया तसेच राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर प्रक्रिये विरोधात शहरातील विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन याविरोधात निदर्शने करून मंगळवार दि.१४ रोजी रात्री शहरातील किदवाई रोड परिसरात कॅन्डल मार्च काढून निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

नागरिकत्व दुरुस्ती कायदा, नागरिकत्व नोंदणी प्रक्रिया तसेच राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर प्रक्रिये विरोधात शहरातील विविध मुस्लिम संघटना विरोध करीत असून या विरोधात मोर्चे देखील निघाले होते. आता मंगळवारी विद्यार्थ्यांनी या विरोधात रस्त्यावर उतरून शहरातील किदवाई रोडवर शहीदो की यादगार चौकात कँडल मार्च काढून निषेध सभेचे आयोजन केले होते. 

यावेळी विद्यार्थी संघटनांचे समीर खान, इमरान रशीद, यासीन अयुब, अजीज एजाज शेख आदी विद्यार्थी नेत्यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दात टीका केली. तसेच विविध विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा यावेळी निषेध करण्यात येऊन केंद्र सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. 


ताज्या बातम्या