Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
गिरणा नदीपात्रात तरुणाची उडी घेऊन आत्महत्या

दि . 16/01/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील गिरणा पुलावरून वसीम खान इस्माइल खान (३५) रा. नुमानीनगर,मालेगाव या तरुणाने काल बुधवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे.  

मृत वसीम याने गिरणा नदीवर असलेल्या पुलाच्या कठड्यावरून थेट नदीपात्रात उडी घेतली. पुलाच्या परिसरात असलेल्या नागरिकांनी तत्काळ अग्निशामन दलाचे अधीक्षक संजय पवार तसेच किल्ला पोलिसांना यांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे शकील तहेराकी, मधुकर बच्छाव, भूषण ठाकरे, महेश सांगळी, अजय पवार आदींसह किल्ला पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोचले. 

कर्मचारी शकील तेहराकी यांनी गिरणा नदीपात्रात त्या तरुणाचा शोध घेतला सुमारे अर्ध्या तासाच्या शोध कार्यानंतर त्या तरुणाचा मृतदेह हाती लागला. अग्निशामन दलाच्या कर्मचार्‍यांनी मृतदेह पोलिसांच्या सुपूर्त केला असून शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. वसीमच्या आत्महत्या मागचे कारण मात्र कळू शकलेले नाही. किल्ला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. 


ताज्या बातम्या