Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट

दि . 15/01/2020

राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज माजी केंद्रीय कृषी मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज सदिच्छा भेट घेतली. खासदार श्री.पवार यांचे कृषी क्षेत्राचा अभ्यास आणि त्यांचे योगदान पाहता राज्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरीसाठी त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, असे श्री.भुसे यांनी सांगितले.

सकाळी श्री.भुसे यांनी श्री.पवार यांच्या येथील निवासस्थानी भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ग्रामीण भागाचे अधिकाधिक दौरे केले पाहिजे. कृषी विद्यापीठांची महत्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन शेतीच्या विकासासाठी त्याचा योग्य तो वापर करणे, कृषी क्षेत्रात ज्या संस्थांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे त्यांच्या भेटी घेणे, आदी बाबी श्री.पवार यांनी श्री.भुसे यांना सांगितल्या.


ताज्या बातम्या