Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सुरक्षित मानवी भविष्यासाठी भूगोलाचे रक्षण करणे गरजेचे – प्राध्यापक जे.व्ही.मिसर

दि . 14/01/2020

रावळगाव : औद्योगिक क्रांतीनंतर यंत्र-तंत्रामध्ये झपाट्याने बदल होत गेला आहे आणि वृक्षवेलींच्या जंगला ऐवजी सिमेंट –कॉन्क्रीटचे जंगल झपाट्याने वाढत चालले आहे यातून ओझोन वायूचा क्षय होणे, पर्यावरणाचे अतोनात नुकसान होणे हे दिवसे-दिवस वाढत चालले आहे आणि  यातून जागतिक तापमान वाढ ही दरवर्षी नवेनवे उंच्चांक गाठत चालेली आहे. कुठे कोरडा तर कोठे ओला दुष्काळ अशी परिस्थिती सतत उद्धभवत आहे या सर्वांवर मात करून मानवी भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर भूगोलाचे रक्षण करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता.बागलाण जि.नाशिक संचलित, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथील कार्यक्रम प्रसंगी भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक जे.व्ही.मिसर यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. अरुण डी. येवले तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता.बागलाण जि.नाशिक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुरेश दादाजी वाघ, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.गौतम.एस.निकम उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक जे.व्ही.मिसर यांनी मार्गदर्शन केले.

तत्पूर्वी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागाचे प्रा. नितीन आर. शेवाळे यांनी व्यक्त केले. त्यात त्यांनी महाविद्यालयात भूगोल विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन भूगोलदिनाचे महत्व सांगितले. त्यात ते म्हणाले की, गेली तीस वर्ष १४ जानेवारी हा भूगोल दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाच्या पातळीवर भूगोल विषयाचे तज्ञ प्रोफेसर चं. धुं. उर्फ सी. डी. देशपांडे यांचा सत्कार १९८६ मध्ये पुणे येथे पं.भीमसेन जोशी यांच्या हस्ते झाला होता. पुण्यातील पत्रकार, लेखक डॉ. सुरेश गरसोळे यांनी तो घडवून आणला होता. तेव्हा पासून मकरसंक्रांतीच्या दिवसापासून डॉ. सी. डी. देशपांडे यांचा जन्मदिन महाराष्ट्रभर “भूगोल दिवस” म्हणून साजरा केला जातो.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.गौतम.एस.निकम हे मनोगत व्यक्त करताना भूगोल विषय व त्यातील विद्यार्थांना असेलेल्या संधी या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यामधून कृष्णा गेंद, तुषार गायकवाड, निकिता रौंदळ या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अरुण डी. येवले यांनी पृथ्वीचे होणारा ऱ्हास कसा थांबविता येईल या विषयावर मार्गदशन केले. मानवी हव्यासापोटी पृथ्वीवरील प्रदूषण व पृथ्वीचे वाढत जाणारे तापमान यावर चिंता व्यक्त केली. त्यासाठी गांभीर्याने विचार करून तात्काळ उपाययोजना अमलात आणणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन आपली वसुंधरा स्वछ ठेवणे हि वैकक्तिक जबाबदारी आहे असे ते म्हणाले.

सदर कार्यक्रमानिमित्त भूगोल विभागात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भिंतीपत्रक प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेमधून भामरे पुष्पक नामदेव (F.Y.B.sc) हा प्रथम गायकवाड तुषार गुलाब (S.Y.B.sc) हा द्वितीय तर शिरोळे राकेश बाळू (S.Y.B.sc) हा तृतीय, रांगोळी स्पर्धेमधून समृद्धी देवेंद्र शिंदे व स्नेहल संजय मोरे (प्रथम), दिपाली कैलास रौंदळ व निकिता सुभाष  रौंदळ(द्वितीय) तर  मोहिनी मार्तंड व निकिता रिपोटे यांच्या रांगोळीस तृतीय, हर्षदा हेमराज भदाणे  हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. भिंतीपत्रक स्पर्धेमधून पवार राजश्री नारायण प्रथम, समृद्धी देवेंद्र शिंदे द्वितीय, शिरोळे राकेश बाळू तृतीय तर वडक्ते संदीप राजेंद्र यास उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी मार्तंड हिने केले. तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अंबादास एन. पाचंगे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा. भरत के. आहेर, प्रा. शरद टी. आंबेकर, प्रा.एन.बी.महाजन, प्रा.जे.के.अहिरे, प्रा. एन. आर. शेवाळे, प्रा.सौ.जी.एस.खैरनार,प्रा. सौ. व्ही. एन.पवार, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्या