Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
भ्रष्टाचारा विरोधात टोकडे ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

दि . 14/01/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :-  गावातील विविध विकासकामांमध्ये ग्रामपंचायतीने केलेल्या  भ्रष्टाचाराविरोधात टोकडे ग्रामस्थांनी ६ जानेवारी रोजी आंदोलन करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावेळी गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान ग्रामस्थांनी आठ दिवसात कारवाई न झाल्यास १४ जानेवारी पासून रोज सकाळी ११ ते ५ या वेळेत पंचायत समिती प्रवेशद्वारा समोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता.

या अनुषंगाने काल मंगळवार दि.१४ जानेवारी रोजी टोकडे ग्रामस्थांनी विठोबा द्यानद्यान यांच्या नेतृत्वात येथील पंचायत समिती कार्यालयाच्या 
प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. गावातील विविध विकासकामांमध्ये ग्रामपंचायतीने केलेल्या भ्रष्टाचाराचे विविध पुरावे सादर करून देखील संबंधितांवर कारवाई होत नसल्याने प्रशासन भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. १३ जानेवारी पर्यंत संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अपहाराची रक्कम विनाविलंब प्रचलित नियमानुसार वसूल करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. अखेर याप्रकरणी कुठलीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात विठोबा द्यानद्यान,   सचिन फरस, नितीन सुमराव, विजय डिंगर, हेमंत फरस, जव्हार संगेडा, सोपान सुमाराव, दीपक डिंगर, गोटू धाडीवाल, नितीन धनगर, संजय डिंगर, प्रकाश शेजवळ, वसंत शेजवळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


ताज्या बातम्या