Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन ; रस्ता पुस्तिका वाहतुकीची पाठशाळा व माहिती पत्रकांचे अनावरण..

दि . 14/01/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालया तर्फे काल दि.१३ जानेवारी रोजी ३१ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२० चा  उद्घाटन सोहळा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे, मालेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष आर.के.बच्छाव, मसगा महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश शिरुडे, बाल रुग्णालय अधीक्षक डॉ.महेंद्र पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महाले, महामार्ग सहाय्यक पोलिस निरीक्षक भालेराव, तृष्णा गोप नारायण तसेच शहर वाहतूक शाखा मालेगाव यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला.

येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी केले. 
मान्यवरांच्या हस्ते रस्ता पुस्तिका वाहतुकीची पाठशाळा व माहिती पत्रकांचे अनावरण करण्यात आले. रस्ता सुरक्षा सप्ताह हा सप्ताह पुरता नसून हा वर्षभर चालणारा उपक्रम असून यात सर्वांनी सहभागी होऊन वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे याबाबत बिडकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच अपघात झाल्यावर अपघात ग्रस्त व्यक्तींना एका तासात मदत मिळणेसाठी सहाय्य करणे बाबत डॉ.महाले यांनी मार्गदर्शनपर सूचना केल्यात. प्राचार्य शिरूडे यांनी रस्ता सुरक्षा विषयी नियमांची विशेष माहिती देऊन मार्गदर्शन केले. तर ऍड.बच्छाव यांनी कायदेविषयक माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी कोठाव दे यांनी केले तर आभार मोटर वाहन निरीक्षक अतुल सुर्यवंशी यांनी मानले. यावेळी वाहन चालक मालक, महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच कार्यालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


ताज्या बातम्या