Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सहा वर्षीय चिमुरडीवर चुलत भावाकडूनच अत्याचार मालेगाव तालुक्यातील घृणास्पद घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षेची मागणी, नागरिकांमध्ये संताप...

दि . 13/01/2020

मालेगाव :- तालुक्यातील वडनेर खाकूर्डी पोलिस ठाणे हद्दीत दोन दिवसांपूर्वी सख्ख्या चुलत भावाने नात्याने चुलत बहीण असलेल्या एका सहा वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून या घटनेचा गावकऱ्यांनी तीव्र निषेध करीत आंदोलन केले. आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी यासाठी गावकऱ्यांनी बंद पुकारला असून या नराधमाला फाशीची शिक्षा मिळावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे. घटनास्थळी प्रशासकीय विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत.

चिमुरडीची प्रकृती गंभीर..

यातील पिडीत चिमुरडीचा सख्खा चुलत भाऊ राकेश उर्फ बाप्पू देवराम रौदळ या बावीस वर्षीय विकृताने चॉकलेटचे आमिष दाखवून सोबत शेतात नेले व तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. पिडित चिमुरडी ही या नराधमाच्या ताब्यात सकाळी ९:३० पासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होती. पीडितेच्या गुप्तागाला गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या असून तिला प्रथम मालेगावच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी तिला धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आरोपीला कडक शासन व्हावे,अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.


ताज्या बातम्या