Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नागरिकत्व कायद्याविरोधात महासभेत ठराव करणार ; दस्तूर बचाव कमिटीच्या वतीने २६ जानेवारीला ७० ठिकाणी ध्वजारोहण

दि . 13/01/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- केंद्राने लागू केलेला नागरिक कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात येथील दस्तूर बचाव कमिटीच्या वतीने जनता दल गटनेत्या शान-ए-हिंद यांच्या नेतृत्वात दि. ६ जानेवारी रोजी शहरातून मुस्लीम महिलांचा मोर्चा काढण्यात आला होता. या कमिटीने मालेगाव महापालिकेच्या महासभेत देखील या विरोधात आवाज उठवण्याचे निश्चित केले असून दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी शहरात ७० ठिकाणी निदर्शने करून ध्वजारोहण केला जाणार असल्याची माहिती शान-ए-हिंद यांनी दिली.

येथील उर्दू मिडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी कमिटीच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. शान पुढे म्हणाल्या की, हजारोच्या संख्येने मुस्लीम महिलांनी नागरिक कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात मोर्चा काढला असून महापालिकेतील येत्या महासभेत महागठबंधन आघाडीच्या गटनेत्या या नात्याने सदर कायदा केंद्राने मागे घ्यावा या मागणीचा ठरावा महापौर, आयुक्तांनी करावा अशी मागणी करणार आहेत. महासभेत एकमताने कायद्या विरोधात ठराव झाल्यास मालेगावात कायद्याला विरोध आहे असा संदेश केंद्र सरकारला मिळेल. तसेच येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वात शहरातील वेगवेगळ्या ७० ठिकाणी ध्वजारोहण केले जाणार असून दुपारी १२ ते ३ या वेळेत या कायद्याविरोधात निदर्शने केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


ताज्या बातम्या