Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पश्चिम वहिनी नदी पूर्व वहिनी करून गिरणा खोऱ्यात पाणी द्यावे ; वांजुळ पाणी संघर्ष समितीचे पालकमंत्री भुजबळ यांना निवेदन 

दि . 13/01/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- पश्चिम वहिनी नद्यांचे पाणी प्रवाही वळण पद्धतीने पूर्व वहिनी करून गिरणा खोऱ्यात ५० टीएमसी पाणी देण्यात यावे, या मागणीसाठी वांजुळ पाणी संघर्ष समितीतर्फे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन यासाठी केलेला पाठपुरावा, नकाशे, विविध अभ्यासकांचे लेख व पेपर कात्रण असलेला अहवाल सादर करण्यात आला.

नार पार, अंबिका औरंगा, तान मान या पश्चिम वहिनी नद्यांचे पाणी प्रवाही वळण पद्धतीने पूर्व वहिनी करून गिरणा खोऱ्यात कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, चाळीसगाव, नांदगाव सह जळगाव, धुळे, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये ५० टीएम सी पाणी देण्यात यावे यासाठी वांजुळ पाणी संघर्ष समिती पाठपुरावा करत आहे. त्या अनुषंगाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री  छगन भुजबळ यांनी यात विशेष लक्ष घालून महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी महाराष्ट्रालाच मिळाले पाहिजे, गिरणा खोऱ्यात ५० टीएमसी पाणी मिळावे, यासाठी कृषी मंत्री ना. दादा भुसे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी ना.भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी व लोक प्रतिधींनीच्या उपस्थितीत नाशिक येथे संयुक्त बैठक घेऊन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
 
यावेळी प्रा के.एन.आहिरे, विश्वासराव देवरे, निखिल पवार, दत्तू नाना खैरनार, देवा पाटील, प्रभाकर शेवाळे, कुंदन चव्हाण, नरेंद्र सोनवणे, संजय खैरनार, सुशांत कुलकर्णी, विशाल पवार, किशोर काळूंखे, अतुल लोढा, राकेश जगताप, राकेश काळूंखे, मोहन कांबळे, श्याम गांगुर्डे आदी उपस्थित होते.


ताज्या बातम्या