Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेची हेळसांड..

दि . 11/01/2020

रुग्णालयांची संवेदनशीलता गेली कुठे?

मालेगावात प्रशस्त असे शासकीय रुग्णालय,मनापाचेही रुग्णालय आणि आत्ता सटाणारोडवरील महिला रुग्णालय असतांना रोजच पेशंट पाठवले जातात धुळ्याला..

एका सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेले चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनाचा निषेध केला जात आहे.

अपघाती रुग्ण व गर्भवती महिला शासकीय किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी येतात. त्यांना वेळेवर उपचार मिळावे, अशी त्यांच्या कुटुंबीयांची अपेक्षा असते. पण त्यासाठी डॉक्टरांच्या मनात संवेदनशीलता आणि रुग्णांविषयी आस्था असली पाहिजे. जी काही फारशी दिसून येत नाही.असा प्रकार घडला आहे काल रात्री मालेगाव सामान्य रुग्णालयात. देवळा तालुक्यातील दहिवड येथील डिलिव्हरी साठी आलेल्या गर्भवती महिलेला मध्यरात्री उपचाराची अत्यंत गरज असतांना डिलिव्हरी साठी भुलचा डॉक्टर नसल्याच्या कारणावरून देवळ्याहून आलेल्या महिलेला पुन्हा धुळ्याला पाठवा असे सांगण्यात आल्याने त्या महिलेची परिस्थिती बघता नातेवाईक तर निःशब्दच झालेत.अश्या परिस्थितीत तिला रस्त्यात काही झाले तर काय असा प्रश्न पडला.पण,त्यांनी खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि अश्यर्य असे की मध्य रात्री रुग्णवाहिकाच उपलब्ध झाली नाही.रुग्णांचे हाल होत असलेले दिसत असतांना देखील खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी नियम नाही असे म्हणतच त्यांनी धन्यता मानली.
अश्या परिस्थितीत हतबल झालेल्या महिलेच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागली त्याच वेळी त्यांची सामाजिक कार्यकर्ते देवा पाटील भेटले आणि त्यांनी खाजगी रुग्णवाहिका बोलावून त्या महिलेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवले पण हा सर्व प्रकार देवा पाटील यांनी मध्यरात्री आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर टाकल्याने माणुसकीशून्य,निगरगट्ट आणि व्यवसायाची आस्था नजुमानणाऱ्या रुग्णालय प्रशासनाचा मालेगावात मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.


ताज्या बातम्या