Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सहावर्षीय चिमुरडीवर संख्या चुलतभावाकडूनच अत्याचार; मालेगाव तालुक्यातील घृणास्पद घटना, नागरिकांमध्ये संताप..

दि . 11/01/2020

चिमुरडीला उपचारासाठी प्रथम मालेगावात शासकीय रुग्णालयात नंतर धुळे येथे उपचारासाठी पाठवले असून प्रकृती गंभीर...

मालेगाव: यातील पिढीत सहा वर्षीय बालिकेला तिचाच सख्खा चुलतभावाकडूनच राकेश उर्फ बाप्पू देवराम रौदळ या बावीस वर्षीय विकृताने चॉकलेटचे आमिष दाखवून सोबत शेतात नेले व तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केले.पिडित बालिका नराधमाच्या ताब्यात सकाळी ९:३० पासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होती. पीडितेच्या गुप्तागाला गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या असून तिला प्रथम मालेगावच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र,पीडितेचि प्रकृती अधिक बिघडत चालल्याने तिला धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.या संतापजनक घटनेची फिर्याद पीडितेच्या वडिलांनी दिली असून लोकांमधे प्रचंड रोष आहे.देशभरात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढच होत असल्याचे या घटनेवरून समोर येत आहे. चुलतभावाकडूनच या नात्याला काळिमा फासणाऱ्या राकेश रौदळ याला वडणेर खा.पोलिसांनी ताब्यात घेतले असून,प्रथम अपहरण व मारहाण करून बाल अत्याचार कायदा पोस्को अंतर्गतरात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला कडक शासन व्हावे अशी संतप्त नागरिकांकडून मागणी होत आहे.गुन्हा घडल्याचा ठिकाणी वडणेर खा.पोलिस स्टेशन चे पोलीस अधिकारी आर.डी.मोताळे यांनी भेट देऊन गुन्ह्या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली आहे.या गुन्ह्याचा तपास विशाल पाटील हे करीत आहेत.


ताज्या बातम्या