Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
तिकीट खरेदीवर ५० रुपयाचे कुपन बंधनकारक केल्याच्या निषेधार्थ सिनेमॅक्समध्ये ग्राहकांचे आंदोलन ; ग्राहक मंच व ग्राहकांच्या आंदोलनामुळे सिनेमॅक्स चालक वठणीवर..

दि . 10/01/2020

मालेगाव: सिनेमागृहात कुपन बंधनकारक केल्याने ग्राहकांना आर्थिक ताण सहन करावा लागत असल्याच्या विरोधात मालेगाव सिनेमॅक्सच्या समोर ग्राहकांचे धरणे;  सिनेमॅक्स चालकाने कुपन बंधनकारक करणार नसल्याचे आश्वासनानंतर आंदोलन मागे..

ग्राहक संरक्षण कायद्याच्या आधारे अनेक  ग्राहक हिताचे निर्णय आजपर्यंत दिले गेले आहेत. असाच एक वैशिष्टय़पूर्ण निर्णय सिनेमॅक्सच्या संदर्भात राष्ट्रीय आयोगाने दिला असुनही मालेगाव शहरातील सिनेमॅक्समध्ये तिकीट खरेदीबरोबर ५० रुपयाचे कुपन बंधनकारक करीत असल्याने ग्राहकांना आर्थिक झळ सोसावी लागत होती. त्याविरोधात आज मालेगाव येथील संदेश सिनेमॅक्स येथे चित्रपट बघण्यास आलेल्या श्रोत्यांनी आक्रमक होत सिनेमॅक्सच्या प्रवेशद्वारा समोर बसून आंदोलन केल्याने सिनेमॅक्स प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. अखेर अर्ध्या तासानंतर या आंदोलनाची दखल घेत सिनेमॅक्स चालकाने कुठल्याही तिकिटावर कुपन बंधनकारक करणार नसल्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.

चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका ५० रुपयांचे कुपन घेण्यास नकार दिला. यावेळी ग्राहकाने तिकिटावर कुपन संदर्भात कुठलाही उल्लेख नसून सिनेमागृहातही अशा प्रकारची सूचना कुठेही लिहिलेली नसल्याचे सांगितले. मात्र कुपन घेणे बंधनकारक असल्याने ग्राहकाने या विरोधात आंदोलनाचा निर्णय घेतला.  यावेळी पत्रकार मनोहर शेवाळे यांनी याबाबत ग्राहक मंचाचे हरीश मारू यांचेशी संपर्क साधून याविषयी कल्पना दिल्याने हरीश मारू यांनी आंदोलनस्थळी भेट देत याची दखल घेतली.    


ताज्या बातम्या