Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
इथे कोणाची गरज नाही काम करा नाही तर खुर्ची खाली करा-कृषिमंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान..

दि . 09/01/2020

कार्यालयात बसून नराहता अधिकाऱ्यांनी फिल्डवर जावे म्हणजे शेतकऱ्यांची वास्तव परिस्थिती लक्षात येईल.त्यासाठी गावागावात फिरून जनतेला काय अडचणी आहेत ते बघा.
अधिकाऱ्यांनी आपली मानसिकता बदला,आपली जबाबदारी ओळखा.जनतेला शासकीय कार्यालयात रोज हेलपाटे मारणार नाहीत यासाठी त्याठिकाणी जाऊन अडचणी सोडवा.
मालेगाव: राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत गेल्या ७ वर्षांपासून ६०० लाभार्थीच्या विहिरींना वीज वितरण व पंचायत समिती यांच्या असमन्वयामुळे आजही वीजपुरवठा जोडला न गेल्याने लाभार्थी शेतकऱ्यांचे नुकसान होत असून यास जबाबदार अधिकाऱ्यांना ना.भुसे यांनी चांगलेच झाडले. यावेळी ना.भुसे यांनी सात दिवसाच्या आत वीज जोडणी करावी अशी सूचना देत शेतकऱ्यांच्या कुठल्याही अडचणी खपवून घेतल्या जाणार नाही, अन्यथा खुर्ची सोडा, अशी तंबी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
ना.भुसे यांनी सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागातील विविध शासकीय योजनांच्या लाभार्थींची प्रलंबित प्रकरणे, व निधी याविषयी काही अडचणी असल्यास त्यासंबधी मंत्रालय स्तरावरून आवश्यक पाठपुरावा व निधी उपलब्ध करून दिला जाईल.असे आश्वासन ना.भुसे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईचे पैसा शेतकऱ्यांना लवकरच लवकर मिळावा यासाठी बँक आणि महसूल व त्यासंबंधी असलेल्या विभागाची तातडीने बैठक घेऊन लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहायला नको त्यासाठी असलेल्या अडचणी सोडवाव्यात असे या बैठकीत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांना मालेगावात शासकीय विश्रामगृह येथिल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत सांगितले.
जातीच्या दाखल्यांसाठी महसूल, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी एकत्रित येऊन दाखले घरपोच कसे करता येईल त्यासाठी यंत्रणा करावी असे आदेश भुसे यांनी दिलेत.घरकुल योजनेचाही आढावा घेतला,बायोगॅस चे टार्गेट,अतिक्रमण कायम करणे यासंदर्भात माहिती घेतली. राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मालेगाव येथे गुरुवार दि.९ रोजी येथील शासकीय विश्रामगृहावर सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रांत विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजीत राजपूत, मनपा आयुक्त किशोर बोर्डे, उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, वन अधिकारी व्ही.डी. कांबळे, कृषी अधिकारी अशोक पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता राहुल पाटील, वीज वितरण अभियंता जे.डी.भामरे आदी विभागाचे  प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी 
तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी कर्जमाफी व अवकाळी पाऊस मदतनिधी याविषयी माहिती देत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावयाच्या निधीचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित काम येत्या दोन ते तीन दिवसात पूर्ण होणार असल्याची माहिती दिली. तसेच अवकाळी पावसामुळे जनावरे मृत  झालेल्यांना नुकसान भरपाई धनादेश प्राप्त झाले असून त्याचे वाटप केले जाईल अशी माहिती राजपूत यांनी यावेळी दिली. यावेळी ना.भुसे यांनी महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी लाभार्थ्यांचे बँक खाते लवकरात लवकर आधारलिंक करून घेण्याच्या सूचना देत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पात्र लाभार्थी वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी अशा सूचना देखील ना.भुसे यांनी केली. या बैठकीत ना.भुसे यांनी महापालिकेच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत शहरातील खड्डेमय रस्ते, अतिक्रमण, अस्वच्छता, आरोग्य आदी प्रलंबित प्रश्नांवर मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी लक्ष देण्याच्या सूचना केल्यात. मोसमपूल ते सटाणा रोड दरम्यान ड्रेनेज पाईपलाईनचे काम होऊन देखील त्यास गटारी जोडल्या नसल्याने ना. भुसे यांनी नाराजी व्यक्त करीत सदर काम लवकरात लवकर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या १० दिवसात तालुक्यातील रस्त्यांचे खड्डे बुजावावते, जीवनप्राधिकरणने २६ गाव, माळमाथा पाणीपुरवठा योजनेत पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश ना.भुसे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्यात. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत गेल्या ७ वर्षांपासून ६०० लाभार्थीच्या विहिरींना वीज वितरण व पंचायत समिती यांच्या असमन्वयामुळे आजही वीजपुरवठा जोडला न गेल्याने लाभार्थी शेतकऱ्यांचे नुकसान होत असून यास जबाबदार अधिकाऱ्यांना ना.भुसे यांनी चांगलेच झाडले. यावेळी ना.भुसे यांनी सात दिवसाच्या आत वीज जोडणी करावी अशी सूचना देत शेतकऱ्यांच्या कुठल्याही अडचणी खपवून घेतल्या जाणार नाही, अन्यथा खुर्ची सोडा, अशी तंबी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
ना.भुसे यांनी सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागातील विविध शासकीय योजनांच्या लाभार्थींची प्रलंबित प्रकरणे, व निधी याविषयी काही अडचणी असल्यास त्यासंबधी मंत्रालय स्तरावरून आवश्यक पाठपुरावा व निधी उपलब्ध करून दिला जाईल.असे आश्वासन ना.भुसे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.


ताज्या बातम्या