Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार; प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून पत्नीसह प्रियकरास तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या

दि . 08/01/2020

टाकळी (ता. मालेगाव) येथील संदीप नाना खैरनार (३२) या तरुणाचा खून दहा दिवसानंतर उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलिसांना यश आले आहे. पत्नीने पुर्वाश्रमीच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी संशयीत पत्नी अर्चना (२६) व तिचा प्रियकर विलास जगताप (३०, रा. चिखलओहोळ) यांना अटक केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंग व अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता. संदीप याचे गावात व परिसरात कोणाशीही वैर नव्हते. तसेच भाऊबंदकी मध्ये देखील कुठलाच वाद नसल्याचे निष्पन्न झाल्याने हा खुनाचा प्रकार अनैतिक संबाधांच्या कारणावरून होऊ शकतो असा संशय पोलिसांना बळावल्याने त्या दिशेने तपासाची चक्रे फिरविण्यात आली होती. यावेळी मयत संदीप यांची पत्नी अर्चना हिचे चिखलओहळ येथील माहेरच्या विलास यशवंत जगताप याच्याशी अनैतिक संबध असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मंगळवार दि. ७ रोजी मयत संदीप याची पत्नी अर्चना व अन्य नातेवाईकांना तपासासाठी पोलीस ठाण्यात बोलावून विचारपूस केली. यावेळी संदीपच्या पत्नीने महाविद्यालयीन जीवनापासून विलास सोबत प्रेमसबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत संदीप सोबत लग्न झाल्यानंतर विलास याची पत्नी मयत झाल्याने गेल्या ९ महिन्यापासून विलास व मयत संदीप याची पत्नी यांचे संबध आले. विलास याने मयत संदीप याची पत्नी अर्चना हीस एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी एक मोबाईल घेऊन दिला होता. संदीप हा कामावर गेल्यानंतर विलास हा मयत संदीप याच्या घरी येत होता. खुनाची घटना घडली त्या दिवशी दि.२८ डिसेंबर रोजी देखील मयत पती संदीप घरी नसताना विलास घरी आला. त्यावेळी अचानक पती संदीप देखील घरी आल्याने विलास व संदीप या दोघात शिवीगाळ व मारहानीचा प्रकार घडला. पत्नी व विलास यांचे प्रेमसंबध उघड होतील या भीतीने संदीपची पत्नी व तिचा प्रियकर विलास याने संदीपचा राहत्या घरी गळा आवळून त्यास जीवे ठार मारले व मृतदेह टाकळी शिवारात फेकून दिला. तसेच रात्रीच्या सुमारास घरासमोरील व्यक्ती व अन्य कुटुंबियांना संदीप हे ड्युटीवरून घरी परतले नसल्याचा बनाव रचल्याची कबुली संदीपची पत्नी हीने पोलिसांना दिल्याने गुन्हाचा उलगडा झाला. दरम्यान पोलीस पथकाने बुधवार दि. ८ रोजी नाशिक येथून संशयित विलास यशवंत जगताप (३०) रा. चिखलओहळ ता. मालेगाव ह.मु.नाशिक यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने संदीपचा खून केल्याची कबुली दिली आहे.

मयत संदीपचा भाऊ सचिन खैरनार याच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात खून करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पती-पत्नी दोघांकडे मोबाईल नाहीत. गावात त्यांचे कोणाशी वैमनस्य नाही. भाऊबंदकीचे अथवा जमिनीचेही वाद नव्हते. यामुळे पोलिसांसमोर या खूनाचा तपास करण्याचे आव्हान होते. पोलिस अधिक्षक आरती सिंह, अपर पोलिस अधिक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील, तालुका पाेलिस निरीक्षक नरेंद्र भदाणे, गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू, स्वप्नील राजपूत, जमादार सुनील अहिरे, हवालदार वसंत महाले, रवींद्र वानखेडे, दीपक अहिरे, पोलिस शिपाई राकेश उबाळे, चेतन संवत्सरकर, देवा गोविंद, हरीष आव्हाड, संदीप हांडगे, अमोल घुगे,  रतीलाल वाघ, फिरोज पठाण, गिरीष बागुल, प्रदीप बहीरम, महिला पोलीस शिपाई दिपाली बच्छाव व सहकाऱ्यांनी टाकळी व परिसरात गेली तीन दिवस कसून चौकशी करुन हा खून उघडकीस आणला.


ताज्या बातम्या