Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
ऑनलाइन विरोधात ऑनलाइन विक्रेत्यांचा कडकडीत बंद..

दि . 08/01/2020

मालेगाव : येथील मोबाईल रिटेलर असोशिएशन ने तहसीलदार यांना निवेदन देवून पुकाराला एक दिवसाचा कडकडित बंद,
सध्या ऑनलाइन विक्री करण्याचा अतिशय जोरात सुरु असलेला व्यावसाया आणि त्यामुळे होत असलेला स्थानिक व ऑफलाइन व्यवसाय करणाऱ्या व्यापारयांचे होत असलेले नुकसान लक्षात घेता आजचा हा बंद पुकारण्यात आला होता.
गेल्या बऱ्याच काळा पासून ऑनलाईन कंपन्या ह्या  भारतात आपला व्यावसाय करीत आहेत परंतु हा व्यावसाय करीत असतांना ते FDI कायद्याची पूर्णतः पायमल्ली करीत आहेत, आणि त्यामुळेच ते ग्राहकांना नको त्या प्रकारे प्रलोभने देत असतात, नको त्या प्रकारच्या सूट देत असतात. यामुळे संपूर्ण देशातील रिटेलर व्यापारी हा देशोधडीला लागला आहे. म्हणून किमान ७ करोड व्यावसाईक यांचेवर सरळ सरळ फरक पडला आहे. आणि त्यांचेवर अवलंबून असणारे सेल्समन, कामगार यांचे वर देखील उपास मारीची वेळ आलेली आहे. याबात गेल्या बऱ्याच वर्षापासून ऑल इंडीआ मोबाईल रिटेलर असोशिएशने (AIMRA) याबात एक चळवळ उभी केली आहे. आणि त्याच अनुषंगाने दिल्ली येथे रामलीला मैदानावर आज आंदोलन होत आहे. ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मालेगाव मोबाईल रिटेलर असोशिएशन त्या आंदोलनास पाठींबा देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी पूर्ण तालुक्यातुन मोठ्या प्रमाणावर मोबाईल व्यावसायीक उपस्थित होते.


ताज्या बातम्या