Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अलकबिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या क्रीडा सप्ताहाचे उदघाटन

दि . 07/01/2020

सोयगाव : शहरालगतच्या दरेगाव येथील किनो संस्थेचे अलकबिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या क्रीडा सप्ताहाचे क्रीडाज्योत प्रज्वलित करून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक राज्य सरचिटणीस विनोद चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनो संस्थेचे सचिव रईस शेख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आतंरराष्ट्रीय धावपटू भिकू खैरनार, संस्थेचे उपाध्यक्ष हाजी सोहेल कुरेशी होते. यावेळी श्री.चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळाला देखील आपल्या जीवनात महत्व दिले पाहिजे. शालेय स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धातूंच चांगलें खेळाडू घडत असल्याचे त्यांनी सांगितले.सदर क्रीडा सप्ताहात विद्यार्थ्यांचे विविध खेळ, क्रीडा स्पर्धा राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य खालीक कुरेशी यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-----------


ताज्या बातम्या