Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव पंचायत समितीच्या सभापती पदी सुवर्णा विजय देसाई तर उपसभापती पदी शिवसेनेचे सरला भिकन शेळके यांची निवड...

दि . 31/12/2019

येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया आज मंगळवार दि. ३१ रोजी पार पडली असून चिठ्ठी टाकून निवड झालेल्या या प्रक्रियेत सभापती पदी हिरे गट (भाजप) सुवर्णा देसाई तर उपसभापती पदी सेनेच्या सरला शेळके यांची निवड झाली आहे.

या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी कामकाज बघितले. १४ सदस्य असलेल्या या पंचायत समिती मध्ये हिरे गट (भाजप) ६  व शिवसेनेचे ६ सदस्य असून राष्ट्रवादी व अपक्ष यांचे प्रत्येकी १ सदस्य आहेत. भाजपच्या कमलाबाई मोरे यांना सेनेच्या गटाने गळाशी लावल्याने सेनेच्या सदस्यांची संख्या ७ झाली.

तर अपक्ष अनिल तेजा व राष्ट्रवादीच्या प्रतिभा सुर्यवंशी यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचे संख्याबळ देखील ७ झाल्याने चिठ्ठी टाकून निवडप्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत सभापतीपदी हिरे गट (भाजप) सुवर्णा विजय देसाई यांची तर उपसभापती पदी सरला भिकन शेळके यांची निवड झाली.


ताज्या बातम्या