Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात हे ३६ मंत्री घेणार शपथ..

दि . 30/12/2019

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज होणार आहे. विधानभवनाच्या परिसरात शपथविधी सोहळा पार पडेल. दुपारी 1 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होईल. आज महाविकास आघाडीतील एकूण 36 मंत्री शपथ घेतील. या कार्यक्रमासाठी साडेचार हजार आसन क्षमतेची व्यवस्था देखील करण्या आली आहे.  या शपथविधी सोहळ्यास 2 हजार पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच आठ एलईडी स्क्रीन्सही लावण्यात आल्यात. 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणते नेते शपथ घेतील याची संभाव्य यादी हाती आली आहे. आज होणाऱ्या विस्तारामध्ये शिवसेनेच्या आमदारांना मंत्री म्हणून शपथविधी घेण्याचे आदेश स्वतः उद्धव ठाकरे यांनी फोन करून दिल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे 13 मंत्री आज शपथ घेतील. दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळाता स्थान मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री होण्यासाठी आग्रह धरला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झालं आहे. आजच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. 

शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार असून त्यात 10 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये कॅबिनेट 10 आणि तीन राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात. काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. 

ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यानं शपथविधी सोहळ्याची रविवारी जय्यत तयारी सुरू होती. विधीमंडळ परिसरातील पार्किंगच्या जागेतच मुख्य स्टेज आणि त्याला जोडूनच भव्य मंडप उभारण्यात आलं आहे. 

संभाव्य यादी

शिवसेना: गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, सुनील प्रभू, अनिल परब, शंभुराजे सरप्रताप सरनाईक किंवा रविंद्र फाटक, रवींद्र वायकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, उदय सामंत, भास्कर जाधव किंवा वैभव नाईक, आशिष जैस्वाल किंवा संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड 

राष्ट्रवादी काँग्रेसः अजित पवार, नवाब मलिक, धनंजय मुंडे, दिलीप वळसे- पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. किरण लहामटे, अदिती तटकरे

काँग्रेसः अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, संग्राम थोपटे, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, के.सी. पाडवी, अमिन पटेल.


ताज्या बातम्या