Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मतदार पडताळणी कार्यक्रम ,स्वतःच करा स्वतःच्या माहितीची पडताळणी 

दि . 28/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) :-  भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२० या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम निर्धारित केला असून त्याची मुदत १३ फेब्रुवारी २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मतदार स्वतः आपली मतदार यादीतील माहिती पडताळू शकणार असून त्यासाठी 'वोटर्स हेल्पलाईन' या अॅपचा वापर करावा लागेल. केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी जावून दिलेल्या माहितीची खात्री करणार असून मालेगाव मध्य मतदार संघात प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती नायब तहसीलदार डाॅ.धर्मेंद्र मुल्हेरकर यांनी दिली. 

एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होईल. यानंतर २७ मार्चपर्यंत हरकती व दावे स्वीकारण्यात येतील. ७ व ८ मार्च तसेच १४ व १५ मार्च रोजी विशेष मोहीम घेण्यात येईल. त्यानंतर १५ एप्रिल २०२० रोजी दावे व हरकती निकालात काढण्यात येतील व ५ मे २०२० रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल .
वोटर्स अॅपवर मतदार नाव नोंदणी, दुरूस्ती, फॅमिली ट्री बनविण्यासाठी आदी बाबीदेखील मतदार करू शकणार आहे. सर्वच मतदारांनी या सुविधेचा वापर केल्यास मतदार यादी अधिक शुद्ध होण्यास मदत होईल. ही मोहीम पर्यवेक्षक यांच्या नियंत्रणाखाली केंद्रस्तरिय अधिका-यांद्वारे राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमास सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


ताज्या बातम्या