Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
युवाशक्तीच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर -  डॉ. शेवाळे                    

दि . 28/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पिंपळगाव येथे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सोयगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालय व झोडगे येथील संदीप कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार दादा शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.जयंत पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संस्थेचे उपसभापती राघोनाना अहिरे यांच्या सह अॅड.आर.के.बच्छाव, विजय पवार, अशोक पवार, के.एन.अहिरे, शैलेश सोनजे, अ.र.पवार, एस.एस.देवरे, एस.बी.इंगळे, डी.एस पवार, राजेंद्र ठाकरे, सयाजी पगार, ग्रामसेवक शिरसाठ भाऊसाहेब आदींसह गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, मविप्र संस्थेचे सभासद, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे थोर विभूतींची प्रेरणा घेऊन शिबिरात आपल्यावर संस्कार घडवून घेतील व आर्थिक सामाजिक राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवतील तसेच युवाशक्तीच्या उज्वल भविष्यासाठी असे हिवाळी शिबिर उपयुक्त ठरतात असे मत डॉ. शेवाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तर अहिरे यांनी विद्यार्थ्यांनी            शिस्तबद्ध पद्धतीने ग्रामविकासाचे महत्त्वपूर्ण कामे हाती घेऊन, संस्थेचा नावलौकिक वाढवावा गावाचा विश्वास जिंकावा असे मत व्यक्त केले. 
आपल्या अध्यक्षयी भाषणात डॉ.पवार यांनी महाविद्यालयाने हे गाव दत्तक घेऊन गावात प्रबोधन, वृक्षारोपण, धार्मिक स्थळांची स्वच्छता व सुशोभीकरण असे ठोस दृष्टीक्षेपात येणारी कामे हाती घ्यावीत व ग्राम विकास घडून आणावा असे मत व्यक्त केले .                                                  

कार्यक्रमासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा.राम सोनवणे, प्रा.अविनाश पगार, प्रा.आहेरराव, प्रा.संगीता आहीरे, प्रा.देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.मनोज जगताप यांनी केले तर आभार संदीप कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फारुख शेख यांनी मानले.


ताज्या बातम्या