Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
डॉ.मृदुला जोशींची मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध

दि . 28/12/2019

मालेगाव (प्रतिनिधी) :- येथील काकाणी नगर वाचनालयात ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या निमित्त आयोजित डॉ.मृदुला जोशी यांच्या 'रहे ना रहे हम' या मैफिलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. चित्रपट संगीत अभ्यासक ,गायिका आणि लेखिका डॉ.जोशी यांनी हिंदी चित्रपट संगीतातले बारकावे, संगीतकारांची वैशिष्ट्ये आणि त्यातील सौंदर्य आपल्या मार्मिक विवेचनात आणि सुरेल गायनाने श्रोत्यांपर्यंत अशाप्रकारे पोहचविले की, सभागृहात वारंवार टाळ्यांचा कडकडाट होतच राहिला.

मनमोहन, खैय्याम, जयदेव, ओ.पी.नय्यर, सचिन देव बर्मन अशा दिग्गज संगीतकारांच्या रचना आपल्या मैफिलीत सादर करून हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ जिवंत केला. कोणत्याही वाद्यमेळ्याशिवाय, एकही साथीदार गायक सोबत न घेता फक्त गायनाद्वारे त्यांनी केलेल्या सादरीकरणास रसिक श्रोत्यांनी मनापासून दाद दिली.
प्रारंभी वाचनालयाचे सहकार्यवाह रविराज सोनार  यांनी डॉ.जोशी यांचा परिचय करून दिला. वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र अजय शाह यांनी त्यांचे स्वागत केले.


ताज्या बातम्या